उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांचा श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स परिवाराकडून विशेष सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2025

उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांचा श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स परिवाराकडून विशेष सत्कार

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड  (ता. चंदगड) येथील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक आणि कवी संजय साबळे यांच्या श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स परिवाराकडून विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत राज्यात उत्तेजनार्थ पुरस्कार व त्रिवेणी संस्कृती शैक्षणिक व क्रीडा संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या विशेष नवोपक्रम सन्मान पुरस्काराच्या निमित्ताने हा गौरव करण्यात आला. यावेळी श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स चंदगड शाखेचे अधिकारी किरण कोडोली, संचालिका सौ. पुष्पा नेसरीकर  मनोज गावडे  यांनी र.भा माडखोलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शुभेच्छा पत्र देऊन श्री साबळे यांचा सन्मान केला.

        कार्यक्रमाला प्रा. आर. एन. साळुंखे, प्रा..ए. डी. कांबळे, प्रा. जी. वाय. कांबळे,प्रा. एस. डी. गावडे याची प्रमुख उपस्थिती होती. 

        मराठी साहित्य, शिक्षण आणि समाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान शिक्षण क्षेत्रातील काम करणारे नवोउपक्रमशील उपक्रमाचे अंमलबजावणी करणारे आणि   मराठी भाषा संस्कृतीचे संवर्धन करणारे व्यक्तिमत्व म्हणून संजय साबळे यांना ओळखले जाते. त्याचप्रमाणे राज्य स्तरीय विषय तज्ज्ञ  म्हणून त्यांचे कार्य लक्षणीय व उल्लेखनीय आहे. त्यांच्या या सामाजिक शैक्षणिक आणि साहित्यिक योगदानाची दखल घेत  श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स परिवारांनी त्यांचा विशेष सत्कार केला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम.एल. चौगुले यांनी शुभेच्छा पत्र पाठवून साबळे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. या सत्कार प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना संजय साबळे म्हणाले की, " श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स ही संस्था सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यशील बांधिलकी जपणारी संस्था आहे." अशा संस्थाकडून होत असलेला सन्मान निश्चितच प्रेरणादायी आहे. यासंबंधी संजय  साबळे यांच्या कार्याचा गौरव झाला असून त्यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची नवीन उर्जा मिळाली आहे.

No comments:

Post a Comment