नेसरी : सी एल वृत्तसेवा
      सध्याच्या वाढत्या तापमानाला आपणच सर्वजन कारणीभूत आहोत. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. भविष्यात आपले आरोग्य सदृढ ठेवायचे असेल तर आतापासूनच प्रत्येक विद्यार्थीनी वृक्षारोपन करून वृक्ष संगोपन करणे गरजेचे असल्याचे मत गडहिंग्लजचे वनपाल एस के निळकंट यानी व्यक्त केले. राजर्षी शाहू हायस्कुल कानडेवाडी मध्ये जागतिक वन दिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.       
        ते पुढे बोलताना ते म्हणाले, सध्याच्या वाढत्या तापमानाला  कारण म्हणजे विकासाच्या नावाखाली होत असलेली मालकी हक्कातील प्रचंड वृक्षतोड.  झाडे त्याचे खोड, फांदया, मुळे आणि पाने तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड वापरतात. त्यामुळे वृक्ष कार्बन शोषक असतात. खर तर एक प्रोढ झाड दरवर्षी जवळपास २२ पौंड पर्यंत कार्बन शोषत असतो, येल सस्टेनोबलीटी नुसार, सरासरी अमेरिकन लोकांचा कार्बन फुटप्रिंट दरवर्षी सुमारे 13 टन  असतो. ज्या परिसरात झाडे आहेत त्या परिसरात १२ ते १८ अंश कमी तापमान असते. जगातील ३० कोटीहून अधिक लोक जंगलात राहतात तर ग्रामीण भाग सोडून  शहर राहणारे अब्जावधी लोक शुद्ध  पाणी,  स्वच्छ हवा, कमी तापमान यासाठी पर्यावरणावरच अवलंबून असतात. वृक्ष अत्यंत महत्वाचे असल्याने प्रत्येक  विद्यार्थ्यांने एक तरी दरवर्षी झाड लावून त्याचे संरक्षण व संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यानी स्पष्ट केले.
        जागतिक वन दिनाचे औचीत्य साधुन सा. वनीकरण विभागातर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सामाजिक वनिकरणाचे कर्मचारी एस. वाय. यमगेकर, ए. एम. नाईक, टी. एम. पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी  सौ. माटले, आर. एन. यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. आर. व्ही.  जांबोटकर  यांनी सूत्रसंचालन केले तर  जे. डी. रणनवरे यानी आभार व्यक्त केले.
 

 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment