रविवारी निट्टूर येथे होणाऱ्या कुस्ती मैदानाचे C L News वर थेट प्रक्षेपण - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2025

रविवारी निट्टूर येथे होणाऱ्या कुस्ती मैदानाचे C L News वर थेट प्रक्षेपण

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

       खास गुढीपाडव्यानिमित्त बलभीम तालीम मंडळ व ग्रामस्थ निट्टूर (ता. चंदगड) यांच्यावतीने रविवार दि. ३० मार्च रोजी दुपारी २ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या या मैदानाचे यंदा थेट प्रक्षेपण चंदगड तालुक्याचे मुखपत्र चंदगड पत्रकार संघ संचलित चंदगड लाईव्ह न्युज तथा सी एल न्यूज (CL News) वर कुस्ती शौकीनांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे.

   मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पै कालीचरण सोलनकर व सेनादलाचा ऑल इंडिया चॅम्पियन पै सुशांत तांबुळकर यांच्यात होणार आहे. याशिवाय मैदानात अनुक्रमे महाराष्ट्र चॅम्पियन पै ऋषिकेश पाटील विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै विश्वचरण सोलनकर, महाराष्ट्र चॅम्पियन पै विक्रम शिनोळी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै आप्पा मुलतानी, पै सुनील करवते कवठेपिरान विरुद्ध पै प्रेम पाटील कंग्राळी, पै ओमकार पाटील राशिवडे विरुद्ध ऋषिकेश भिलवडे कवठेपिरान, रोहित चव्हाण कवठेपिरान विरुद्ध प्रथमेश पाटील कंग्राळी, पांडुरंग सोलनकर गंगावेश तालीम विरुद्ध पृथ्वीराज पाटील कंग्राळी, निखिल पाटील निट्टूर विरुद्ध वैभव शिंदे कोल्हापूर, याशिवाय विशेष आकर्षक कुस्त्यांमध्ये निलेश हिरगुडे (बाणगे) विरुद्ध पार्थ पाटील कंग्राळी (कर्नाटक कुमार केसरी), आकाश पुजारी निट्टूर विरुद्ध श्रीनंद निलजी, अविनाश पाटील निट्टूर विरुद्ध श्रेयस राऊत दाटे आदी ७० नेत्रदिपक चटकदार कुस्त्या होणार आहेत.

      आखाडा पूजन सरपंच गुलाब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र चॅम्पियन पै. विजय पाटील (रेल्वे) व पुंडलिक रामू पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांचे सचिव प्रल्हाद हिरामणी, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, अप्पी पाटील, रमेश रेडेकर, महाराष्ट्र केसरी पै विष्णू जोशीलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कुस्ती शौकिनांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

       या कुस्त्यांचे थेट प्रक्षेपण CL News वर करण्यात येणार आहे. कुस्त्यांचा आँखो देखा हाल पाहण्यासाठी आपण सी एल न्यूज च्या  https://www.youtube.com/@CLNEWS99 या लिंक वर टच करून आपण मैदानातील नेत्रदिपक कुस्त्यांचा आनंद लुटू शकता.


No comments:

Post a Comment