चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या रोजगार मिळाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. गोवा येथील अनन्या मॅनपावर सर्विस प्राइवेट लिमिटेड यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यामध्ये आजरा गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातून अनेक तरुणांनी हजेरी लावली होती. यामध्ये एकूण ५२ विद्यार्थ्यांची कंपनीच्या विविध पदासाठी निवड करण्यात आली. मेळाव्याचे उद्घाटन कंपनीचे मॅनेजर चंदन नाईक यांनी केले व रोजगार मेळाव्या संदर्भात मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
प्लेसमेंट विभागाचे प्रमुख समन्वयक डॉ. राजाराम साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गोरल यांनी मार्गदर्शन केले. मॅनेजर संदेश गुरव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. आभार डॉ. टी. ए. कांबळे यांनी मानले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी डॉ. एस. एस. सावंत. प्रा. व्ही. के. गावडे, प्रा. आर. एस. पाटील, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. एल. एन. गायकवाड, डॉ. पांडुरंग भादवणकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment