रहिवासी संघ चंदगड तालुका पुणे यांच्या वतीने २४ ते २६ मार्च रोजी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2025

रहिवासी संघ चंदगड तालुका पुणे यांच्या वतीने २४ ते २६ मार्च रोजी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा


चंदगड : सी एल वृत्तसेवा
    पूर्ण कोल्हापूर जिल्हा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील क्रिकेटपटूंसाठी नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुका पुणे यांनी क्रिकेट खेळण्याची मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. रहिवासी संघाच्या वतीने ह्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा छत्रपती शिवाजी क्रीडांगण  ग्राउंड (दोडके ग्राउंड) वारजे माळवाडी, आर एम डी कॉलेज जवळ पुणे येथे 24 25 व 26 मार्च 2025 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत या वेळेत पार पडतील. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक साठी रोख रुपये 25,551 व चषक, द्वितीय क्रमांक 15,551 रुपये रोख व चषक, तृतीय क्रमांक 10,551 रुपये रोख व चषक, याशिवाय मॅन ऑफ द मॅच मॅन, ऑफ द सिरीज, सलग तीन षटकार किंवा सलग तीन विकेट साठी रोख रुपये 1,111 अशी स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. प्रवेश फी रु. 3499 असून 20 मार्च पर्यंत संघांची नावे नोंदणी करावीत असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment