![]() |
परशराम धोंडीबा कागणकर |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
तावरेवाडी (ता. चंदगड) येथील रहिवासी परशराम धोंडीबा कागणकर वय ७५ यांचा ताम्रपर्णी नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना २४ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची वर्दी सुभाष गुंडू पाटील रा. तावरेवाडी यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबतची हकीगत अशी तावरेवाडी गावचे परशराम धोंडीबा कागणकर हे काऊल नावाच्या शेताजवळ ताम्रपर्णी नदीच्या काठी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी म्हणून १९ मार्च रोजी गेले होते. तेव्हांपासून ते बेपत्ता असल्याची नोंद चंदगड पोलिसात दाखल करण्यात आली होती. दरम्यान आज दिनांक २४ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास वर्दीदार सुभाष गुंडू पाटील हे नदी काठी गेले असता ताम्रपर्णी नदी पात्रात त्यांना मृतदेह तरंगताना दिसला. हे फोनवरून त्यांनी पोलीस पाटील यांना सांगितल्यानंतर ग्रामस्थ व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर विलास कागलकर यांनी मयत हे आपली नातेवाईक असल्याचे सांगितले. परशराम हे नदीकाठी गेले असता तोल जाऊन किंवा पाय घसरून पाण्यात पडून मयत झाले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पोहेकॉ कुरणे हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment