चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील देवरवाडी नजीकच्या वैजनाथ मंदिरचे पुरोहित प्रमोद प्रभाकर बर्वे (वय ३२, रा. देवरवाडी) यांनी विष प्राशन केल्याने दि. २४ रोजी मृत्यू झाला. या घटनेने चंदगड तालुका व बेळगाव सीमा भागात एकच खळबळ उडाली आहे. विष प्राशन केल्याची ही घटना बुधवार दि. १८ मार्च २०२५ रोजी घडली होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीमध्ये प्रमोद यांनी ट्युनिक नावाचे तणनाशक सेवन केले होते. चिंताजनक अवस्थेत त्यांना बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि उपचार सुरू असताना त्यांचे आज (सोमवारी) निधन झाले. घटनेची नोंद वैद्यकीय अधिकारी केएलई हॉस्पिटल बेळगाव यांच्या वर्दीवरून चंदगड पोलिसात झाली आहे.
यासंदर्भात पोलिसातून मिळलेली माहिती अशी की, प्रमोद बर्वे यांनी विष प्राशन करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याचा शोध चंदगड पोलीस करत आहे. मयत प्रमोद बर्वे यांच्या पश्चात आई, पत्नी, लहान दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.
घटनेची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ नुसार आकस्मिक निधन म्हणून झाली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पो.हे.कॉ. पाटील करत आहेत.
No comments:
Post a Comment