उत्साळीचे तरूण अधिकारी कदम यांनी गाजवली जळगाव जामोद नगरपरिषद - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2025

उत्साळीचे तरूण अधिकारी कदम यांनी गाजवली जळगाव जामोद नगरपरिषद

एस. ए. कदम 
कर निर्धारण अधिकारी
तेऊरवाडी : / सी एल वृत्तसेवा 
  चंदगड तालूक्यातील उत्साळी गावातील एस ए कदम या तरुणाची स्पर्धा परिक्षेतून जळगाव जिल्हयातील जामोद नगरपंचायतीला कर निर्धारण अधिकारी म्हणून निवड झाली. आपली निवड सार्थकी लावत प्रामाणिकपणा व आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ सूरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या स्टॉफच्या साहाय्याने नगर पंचायतीच्या इतिहासात प्रथमच  ४३% अशी विक्रमी करवसुली नोंदवली. 
      जळगाव जामोद नगर परिषदेने  ६१ लाख २० हजार १०७ रुपये  कर जमा केला. एस ए कदम यानी यावर्षी कर मालमत्ता वसुली मोहीम जोरात सुरू केली. यंदा कर संकलन गेल्या वर्षीपेक्षा १७% जास्त झाले. जे नगर परिषदेने आतापर्यंत केलेले सर्वाधिक विक्रमी संकलन आहे.  गेल्या वर्षीं १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत १ कोटी १२ लाख ४ हजार ३५५ रुपयांच्या थकबाकी कर वसुलीपैकी केवळ ४० लाख ९ हजार २९५ रुपये वसूल झाले, जे केवळ २६.२५ टक्के वसुली होते. त्या तुलनेत यंदाची करवसुली सर्व रेकॉर्ड मोडणारी असल्याचे म्हटले जाते. नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सूरज जाधव यांचे या कामी मार्गदर्शन लाभले.
    चंदगड सारख्या दुर्गम तालुक्यातून उत्साळी सारख्या आरती दुर्गम ग्रामीण भागातील युवकाने आपल्या कार्यातून दाखवलेली चुणूक नगरपालिका व महानगरपालिका वर्तुळात सर्वांना चकित करणारी आहे. त्यांच्या या कार्याबद्दल जळगाव जिल्ह्यात कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment