![]() |
कुदनूर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती विजेता मल्ल पप्पू इंगळगी हात उंचावून अभिवादन करताना सोबत माजी जिप. सदस्य शंकर आंबेवडकर पंच मारुती खंदाळे व गावडू पाटील |
कुदनूर : सचिन तांदळे/ सी एल वृत्तसेवा
हनुमान जयंतीनिमित्त कुदनूर (ता. चंदगड) येथे शनिवार दि. १२/ ०४/ २०२५ कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत कर्नाटक चॅम्पियन पै अप्पू इंगळगी याने महाराष्ट्र चॅम्पियन पै विक्रम जाधव शिनोळी याचेवर एक लांगी डावावर प्रेक्षणीय विजय मिळवला.
![]() |
कुदनूर मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना सुरेश घाटगे, शंकर आंबेवडकर, वसंत नागरदळेकर आदी मान्यवर |
दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त ग्रामपंचायत, हनुमान तालीम मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने निकाली कुस्ती मैदान भरवले जाते. यावर्षी सुरेश घाटगे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन तर माजी जि प सदस्य शंकर आंबेवडकर यांच्या हस्ते श्री हनुमान प्रतिमेचे पूजन झाले. मैदानातील क्रमांक दोनच्या कुस्तीत पै निखिल पाटील कंग्राळी यांने कर्नाटक केसरी कार्तिक इंगळगी याला पराभूत केले. तर क्रमांक तीनची कुस्ती पृथ्वीराज पाटील कंग्राळी विरुद्ध विनायक येळूर यांच्यात बरोबरीत सुटली. क्रमांक चार च्या कुस्तीत कर्नाटक व ऑल इंडिया चॅम्पियन पै निरंजन पाटील येळूर याने साई कंग्राळी याला पराभूत केले. क्रमांक पाचच्या कुस्तीत पै महेश मुंडे कोल्हापूर याने पै सुरज पाटील कडोली याला पराभूत केले. मैदानात पंच म्हणून मारुती खंदाळे, लक्ष्मण भिंगुडे, विजय पाटील, भैरू पाटील, शिवाजी मांडेकर, गावडू पाटील यांनी काम पाहिले. यावेळी वसंत नागरदळेकर, राजू रेडेकर, मारुती आंबेवाडकर, बाबाजान कालकुंद्रीकर आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्राम गुंडकल, शिदबसू कोरी यांनी केले. चंद्रकांत निर्मळकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment