चंदगड : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सेल्फी पॉईंटचे उद्घाटन, सेल्फी पॉईंट ठरला विद्यार्थी आकर्षणाचा केंद्रबिंदू - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2025

चंदगड : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सेल्फी पॉईंटचे उद्घाटन, सेल्फी पॉईंट ठरला विद्यार्थी आकर्षणाचा केंद्रबिंदू

 


चंदगड: सी एल वृत्तसेवा

      विद्यार्थ्यांना आपल्या शाळेबद्दल प्रेम व्यक्त करता यावं या उद्देशाने दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सेल्फी पॉईंटचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष जी. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

      यावेळी परिस्थिती नुसार आपण अपडेट राहिले पाहिजे असा मौलिक संदेश अध्यक्ष जी. एस. पाटील यांनी दिला. प्राचार्य आर. पी. पाटील याच्या मार्गदर्शनाखाली या सेल्फी पाईंटची निर्मिती करण्यात आली. या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे  संस्थेचे सर्व संस्था पदाधिका ऱ्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजिनदार अनंत सुतार, शालेय समिती चेअरमन प्रा. एन. एस पाटील, प्रा. आर. पी. पाटील, एम. एम. तुपारे, एन. के पाटील, प्रा. एम. बी. पाटील, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, शाहू फर्नांडिस, शामराव मुरकुटे, व्ही. डी. देसाई, डी. ए. माने, एम. एम. गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे व प्रा. अर्चना रेळेकर तर आभार एम. व्ही. कानूरकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment