नांदवडे येथील शेतकरी दूध संस्थेवर आमदार शिवाजीराव पाटील व माजी मंत्री भरमू आण्णा पाटील गटाचे वर्चस्व - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2025

नांदवडे येथील शेतकरी दूध संस्थेवर आमदार शिवाजीराव पाटील व माजी मंत्री भरमू आण्णा पाटील गटाचे वर्चस्व


चंदगड / सी एल वृत्तसेवा

      श्री शेतकरी सहकारी दूध संस्था मर्या नांदवडेची पंचवार्षिक निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. संस्थेच्या चेअरमनपदी आप्पाजी सुभाना गावडे हे सहा विरुद्ध चार  मतांनी विजयी झाले तर व्हॉइस चेअरमनपदी जनार्दन नारायण नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जयवंत नारायण पेडणेकर यांनी केले. गट तट विसरून सर्वांनी एकत्र येऊन संस्थेच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन केले.

    संचालक पदी शिवाजी ओमाना गावडे, विठोबा दत्तू कुट्रे, गजानन धोंडीबा गावडे, लक्ष्मण नाना कांबळे, निंगोजी लक्ष्मण गावडे, राजेंद्र भरमगीरी  बुवा, सौ. वनिता विठोबा पाटील, सौ. चंद्रभागा धोंडीबा कुंदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. जी. डोंबाळ व एन. एन. बुगडे यांनी काम पाहिले. यावेळी चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यतत्पर राहण्याचे असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल विविध स्तरातून कौतुक होत आहे या प्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष सुधाकर पाटील, गोकुळ माजी संचालक नामदेव कांबळे, कॅप्टन भरत पाटील, विठोबा पाटील, के. बी. गावडे, सिताराम कांबळे, भैरू गावडे, महादेव आपटेकर, शिवाजी गावडे, जयवंत पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष  गावडे  यांनी केले तर आभार के. बी. गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment