![]() |
संग्रहित छायाचित्र |
कुदनूर : सचिन तांदळे /सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे कुस्ती आखाडा होणे ही काळाची गरज आहे. या याबाबत ग्रामपंचायत कमिटी, गावातील विविध संस्था, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींची व्यापक बैठक आयोजित करून कुस्ती आखाडा उभारणीसाठी चालना देण्यसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
हा खूप महत्त्वाचा गंभीर व कुदनूरकरांच्या जिव्हाळ्याच प्रश्न आहे. कुस्ती खेळात पूर्वी परिसरतील निट्टूर, तेऊरवाडी, कोवाड, कालकुंद्री या गावात इर्षा असायची. सारा परिसर कुस्ती आखाडा गर्दीनं व्यापत होता. हळूहळू या कडे दुर्लक्षित होत गेले परिणामी मल्ल नामशेष होत गेले. एक काळी कुदनूर तालीमत इतर गावातील मल्ल सरावासाठी यायचे. सारी तालीम जोर बैठका मारून घामाने भिजलेली असायची. शेकडो छोटे मोठे पैलवान आपली शरीर यष्टी कमवायचे. या आखाड्यातील पैलवान राज्य पातळीवर खेळले होते. सद्या कुदनूर तालीम मोडकळीस आली अजून याकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळं येथील जुने जाणते ग्रामस्थ नाराज आहेत. गावात हनुमानाचे जागृत दैवत आहे. पूर्वी पैलवान येथे कौल घेऊनच कुस्ती आखाड्यात उतरायचे.
बारा बलुतेदार, विविध जाती धर्मांचे लोक धार्मिक सलोख्याने राहतात. तथापि मोबाईल च्या अतिरेकी जमान्यात कुदनुर येथील तरुणांना योग्य दिशा द्यायची असेल तर खेळांचे मैदान, तालीम व कुस्ती आखाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी हेवे दावे बाजूला ठेवून एकत्र येऊन विचार विनिमय करावा. असे मत जाणकारांतून व्यक्त होत आहे
No comments:
Post a Comment