कालकुंद्री येथील विजय कोकीतकर यांची मुंबई 'मनपा'त सहाय्यक पदी नियुक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2025

कालकुंद्री येथील विजय कोकीतकर यांची मुंबई 'मनपा'त सहाय्यक पदी नियुक्ती

विजय दत्तात्रय कोकितकर
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
   कालकुंद्री (ता. चंदगड) येथील विजय दत्तात्रय कोकितकर यांची मुंबई महानगरपालिकेत वयाच्या ४९ व्या वर्षी कार्यकारी सहाय्यक म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून तहसीलदार कार्यालय चंदगड कडे त्यांनी १० वर्षे सेवा केली होती.
   पदवीधर अंशकालीन संघटनेच्या  मागणीनुसार शासनाने अशी सेवा केलेल्या पदवीधरांना शासकीय नोकरीत घेण्यासाठी वयाची अट शिथिल करण्याचा निर्णय २०१८ मध्ये एका जीआर काढून घेतला होता. त्यानुसार अशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतली जात आहे. यामुळे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना केलेल्या सेवेची फळ सध्या मिळत आहे. ज्यांचे वय सध्या ४५ ते ५०  च्या घरात आहे.  विजय कोकितकर यांचे वय सध्या ४९ वर्षे असून त्यांच्या मागणीनुसार त्यांना मुंबई महानगरपालिका येथे कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment