साहित्यिक कल्लापा पाटील यांना राज्यस्तरीय 'सनराईज' पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2025

साहित्यिक कल्लापा पाटील यांना राज्यस्तरीय 'सनराईज' पुरस्कार

साहित्यिक कल्लापा पाटील यांना राज्यस्तरीय 'सनराईज' पुरस्कार

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
     कालकुंद्री (ता. चंदगड) येथील साहित्यिक कल्लापा जोतीबा पाटील यांना पंढरपूर येथील सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे या संस्थेचा राज्यस्तरीय सनराइज विशेष साहित्य पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
    माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्याहस्ते कल्लापा पाटील यांना  शाल, सन्मानपत्र, मानचिन्ह व रोख रक्कमेसह पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सोलापूर जिप. सदस्य भारत आबा शिंदे, युवानेते दिग्विजय शहाजीबापू पाटील, लेखक डॉ. नंदकुमार राऊत, संस्थेचे अध्यक्ष समाधान गाजरे, साहित्यिक व सचिव अंकुश गाजरे, अजित लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
     लेखक कल्लापा पाटील हे कोल्हापूर जिल्हा परिषद कडे प्राथमिक शिक्षक असून त्यांची आतापर्यंत सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment