चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड: येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये लाठी काठी शिबीराचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. व्यक्तीमत्व विकास,स्वरक्षण, शिस्त व चिकाटी या गुणांच्या विकासासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबीरासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कु. पूर्वा पाटील, प्रसाद कलाल हे मार्गदर्शन करणार आहेत. सोमवार दि २८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत हे शिबीर शाळेच्या मैदानावर होणार आहे. परीसरातील विद्यार्थ्यानी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य आर. पी. पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment