कोवाडमध्ये वाहतूकीची कोंडी करणाऱ्या वाहनांच्यावर पोलिसांची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

24 April 2025

कोवाडमध्ये वाहतूकीची कोंडी करणाऱ्या वाहनांच्यावर पोलिसांची कारवाई

 

कोवाड (ता. चंदगड) येथे वाहतूकीची कोंडी करणाऱ्या वाहनांच्यावर कारवाई करताना पोलीस.

चंदगड / सी एल वृत्तसेवा

    कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठेत  जागा मिळेत तिथं वाहनांचे पार्किंग करुन वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहनांच्यावर आज चंदगड पोलिसानी दंडात्मक कारवाई करुन  वाहनधारकाना दणका दिला. २६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यातून पोलिसानी १६ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक आकाश भिंगारदेवे यांनी दिली.

      कोवाड बाजारपेठेत गुरुवारी आठवडी बाजार भरतो. बाजारादिवशी दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग चुकीच्या ठिकाणी केले जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांना त्याचा त्रास होतो. यासंदर्भात लोकांच्या पोलिसांकडे तक्रारी गेल्याने चंदगड पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशाने उपनिरीक्षक आकाश भिंगारदेवे यांच्या नेतृत्वाखाली कॉंस्टेबल ए. बी. शिरुडकर, एन. ए. पाटील, एस. एस. पाटील यांच्या पोलिस पथकाने वाहतूकीची कोंडी करणाऱ्या वाहनांच्यावर दंडात्मक कारवाई केली. नेसरीरोड, निट्टूररोड, दुंडगे रोड व नवीन पुलावर पार्किंग केलेल्या वाहनांच्यावर पोलिसानी मोटार वाहन कायदा अधिनियम प्रमाणे दंडात्मक कारवाई केली. नवीन पुलावर व बाजरपेठेत चारचाकी व दुचाकी वाहने पार्किंग केली जातात. मुळात रस्त्यावर बाजार भरत असल्याने अशा वाहनांच्यामुळे सतत वाहतूकीची कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. ग्रामपंचायतीनेही नवीन पुलावर पार्किंग करण्याला बंदी घातली असून दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. पण वाहनधारक पार्किंग व्यवस्था नसल्याने जागा मिळेल. त्या ठिकाणी वाहनांचे पार्किंग करत आहेत. मात्र आज पोलिसांच्या कारवाईला त्याना सामोरे जावे लागले.

No comments:

Post a Comment