विद्यार्थ्यांनी देश विकासात आपले योगदान द्यावे - डॉ. महेश चौगले, माडखोलकर महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2025

विद्यार्थ्यांनी देश विकासात आपले योगदान द्यावे - डॉ. महेश चौगले, माडखोलकर महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    बदलत्या परिस्थितीनुसार आपण सर्वजण सजग राहिले पाहिजे, आई-वडील व गुरुजींचे ऋण न विसरता संस्कारशील व्यक्तिमत्व घडवावे असे आवाहन गडहिंग्लज येथील शिवराज कॉलेज अकाउंटशी विभागप्रमुख  डॉ. महेश चौगले यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.

    डॉ. चौगुले आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ``विद्यार्थ्यांनी जीवनाकडे  सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, बीकॉम नंतर करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, त्या संधीचा फायदा घेऊन आपण देश विकासात आपले योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.``

     प्रास्ताविक  महाविद्यालयातील लेखाशास्त्र विभाग प्रमुख ज्येष्ठ प्रा. एस. के. सावंत यांनी विभागातील विविध उपक्रमांचा आढावा घेऊन  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गोरल यांनी व्यवस्थापन शास्त्राचे महत्व सांगून जीवनाशी कसा निकटचा संबंध आहे याचे विश्लेषण करून विविध उदाहरणे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते मोडी लिपी परीक्षेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रा. व्ही के. गावडे यांनी व अश्विनी गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. बहारदार सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले.

    डॉ. टी. ए. कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मोडी लिपी भाषातज्ञ डॉ. बाबली गावडे. डॉ. एस. एस. सावंत. प्रा. हेरेकर यांच्यासह  बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment