![]() |
कोदाळी (ता. चंदगड) येथे एस. टी. चालक व वाहकांचे स्वागत करताना ग्रामस्थ व प्रवाशी. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
गेले नऊ महिने बंद असलेली तिलारी घाटातील एसटी बस वाहतूक अखेर आज बुधवार २ एप्रिल २०२५ पासून पुन्हा सुरू झाली. या मार्गावरून आलेल्या कोल्हापूर पणजी या पहिल्या बसचे ग्रामस्थांनी ड्रायव्हर कंडक्टर यांना फेटे बांधून जल्लोषी स्वागत केले. चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी कालच याबाबत ची माहिती पत्रकारांना दिली होती.
![]() |
कोल्हापूर- पणजी बसचे कोदाळी माऊली मंदीर येथे दोडामार्ग चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करताना |
चंदगड, राधानगरी, कोल्हापूर, गडहिंग्लज,कागल आगाराच्या बस गाड्या चंदगड, कोदाळी मार्गे दोडामार्ग, पणजी गोव्यात गेली ४५ वर्षे याच तिलारी घाटातून धावत आहेत. तथापि २०२४ मधील पावसाळ्याच्या सुरुवातीस घाटातील एका धोकादायक वळणावरील संरक्षक भिंत कोसळल्यामुळे घाटातील सर्व प्रकारची वाहतूक जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन बंद केली होती. येथील एसटी बंद झाल्यामुळे सर्व सामान्य गरीब प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी, शेतमजूर, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू होते. अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी तब्बल अर्धा दिवस खर्च करून आंबोली घाट मार्गे चंदगड व बेळगावला जावे लागत होते. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसत होता. तर एसटी महामंडळालाही लाखो रुपयांच्या फायद्यावर पाणी सोडावे लागले. एसटी बंद असलेल्या नऊ महिन्याच्या काळात मार्गावरील ग्रामपंचायत सरपंच संघटना, सदस्य, विविध समाजसेवी संस्था व संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे ठिय्या, धरणे, लाक्षणिक उपोषण तसेच मार्गावर रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. तरी सुरुवातीस जिल्हाधिकारी व त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व एसटी प्रशासनाने याला दाद दिली नव्हती. अखेर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून नादुरुस्त संरक्षण भिंतीची दुरुस्ती फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाली. त्यानंतरही एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर एसटी सुरू झाली. दि १ एप्रिल रोजी याबाबतचा आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभाग नियंत्रक यांनी संबंधित आगार व्यवस्थापकांना देऊन बस वाहतूक सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्याची अंमलबजावणी आज झाली. घाटातून जाणाऱ्या कोल्हापूर ते पणजी लाल परीचे स्वागत कोदाळी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. एसटीचे वाहक, चालक यांना फेटे बांधून स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, अंकुश गवस, अंकुश गावडे, दत्ताराम देसाई, राजन गावडे, अमित देसाई, सचिन देसाई, भाऊसाहेब देसाई, लिंगाजी गवस, सुप्रिया गवस, प्रभावती केसरकर, सोमा दळवी, शुभम गवस, लक्ष्मण नाईक, अब्दुल नाईकवाडी, शेखर बेळेकर, चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.....अखेर तिलारी घाटातून एसटी सेवा सुरू.
गेले आठ महिने तिलारी घाटातील रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालू असल्याकारणाने एसटी वाहतूक गेले आठ महिने बंद होती. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या अथक प्रयत्नातून रस्त्याचे काम पूर्ण होऊन अखेरीस प्रवाशांसाठी एसटी धावू लागली. त्यामुळे तिलारी मार्गे कोकणातून, पणजी कडे जाणाऱ्या प्रवाशांनी अखेरीस सुटकेचा श्वास सोडला. बुधवार दिनांक २ एप्रिल २०२५ सर्व बसेस पणजी कडे तिलारी मार्गे धावू लागल्या. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांचे खंदे समर्थक लक्ष्मण गावडे (भाजपा सेवा उद्योग महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते एसटीचे पूजन करण्यात आले. चालक व वाहक व प्रवाशांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अंकुश गवस, अंकुश गावडे, योगिनी दळवी, विठ्ठल गावडे, प्रवीण गवस, दत्ताराम देसाई, अर्जुन गावडे, शंकर गावडे, नागोजी दळवी, के. पी. गावडे, तुळशीदास नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment