उमगाव-न्हावेली ग्रामपंचायत डाटा ऑपरेटरच्या कारभाराची चौकशी करा - गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2025

उमगाव-न्हावेली ग्रामपंचायत डाटा ऑपरेटरच्या कारभाराची चौकशी करा - गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन


चंदगड : सी एल वृत्तसेवा 
        गेल्या काही वर्षांपासून उमगाव-न्हावेली ग्रामपंचायतीमध्ये डाटा ऑपरेटरचा मनमानी कारभार चालू आहे. या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेले डाटा ऑपरेटर दीपक गावडे  विविध  दाखल्यासाठी आपल्या मर्जी प्रमाणे वागून लोकांची गैरसोय करत आहे. तसेच तिथे कार्यरत असणाऱ्या ग्रामसेविका व सरपंच यांनाही न जुमानता लागणारी कागदपत्रे वेळेत देत नाही. 
     ऑपरेटर हा ग्रामपंचायत कार्याशी निगडित असून स्वतःचा मनमानी कारभार चालविणे, कोणाचे न ऐकता स्वतःचे वर्चस्व गाजवणे, दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत ग्रामपंचायतीला मनाला वाटेल तेव्हा उपस्थित राहणे, ग्रामपंचायतच्या कामकाजा दिवशी सुट्टी करून वैयक्तिक कामे करणे, ग्रामपंचायतीत आलेल्या ग्रामस्थांशी उद्धटपणे बोलणे, गावातील ग्रामस्थांमध्ये राजकीय वातावरण निर्माण करणे, ग्रामपंचायतमध्ये महत्त्वाच्या व शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले ग्रामपंचायत कर वेळेत भरलेला असून सुद्धा उतारे मागणी केल्यास सर्वर नाही, नंतर देतो अशी उडवा-उडवीची कारणे देणे. असे बरेच कारनामे या कर्मचाऱ्याकडून सुरू आहेत.
     ग्रामस्थांनी डाटा ऑपरेटरला तात्काळ निलंबित करुन त्याठिकाणी नवीन स्थानिक ऑपरेटर नेमावा अशी मागणी केली आहे. याबाबत पंचायत समिती, पोलीस प्रशासन, तहसीलदार कार्यालय चंदगड येथील अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment