कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज चे माजी प्राचार्य कै. डॉ. डी. व्ही. तोगले यांच्या स्मरणार्थ ताम्रगड प्रतिष्ठान चंदगड मार्फत दरवर्षी चंदगड तालुक्यातील स्पर्धकांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष असून ही स्पर्धा ११ मे २०२५ रोजी सकाळी ७ वाजता दुर्गा माता मंदिर चौक कोवाड, ता. चंदगड येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
चंदगड तालुक्यातील स्पर्धकांसाठी मर्यादित असलेली ही स्पर्धा बालवीर गट (इयत्ता ७ वी पर्यंत) कुमार गट (इ. ८वी ते १० वी पर्यंत), युवा गट (११ वी ते २३ वर्षे पर्यंत) मुले व मुली स्वतंत्र आशा ६ गटात होत आहे. प्रत्येक गटातील प्रथम आठ विजेत्यांना रोख बक्षीसे सोबत प्रथम तीन विजेत्यांना मेडल देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना उन्हाळी व्हाईट कॅप देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी ५ मे पर्यंत आपली नावे 'रामू मास्तर अभ्यासिका, तोगले सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र' किणी-कोवाड बस स्टॅन्ड राजीव गांधी पतसंस्था कार्यालय नजीक, किंवा अशोक वर्पे- 7776998310, सुभाष बेळगावकर- 9922088852, संजय कुट्रे- 9420459379 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन ताम्रगड चे अध्यक्ष एन. आर. पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment