'संत्या कुली' या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार व सत्कार स्विकारताना ॲड. संतोष मळवीकर
चंदगड : सी एल वृत्तसेवा
दोन महिन्यापूर्वी प्रकाशित झालेल्या ॲड. संतोष मळविकर यांच्या 'संत्या कुली' या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पुस्तकाला पंढरपूर येथील मानाचा समजल्या जाणाऱ्या रान शिवार राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह व सन्मानपत्राने ॲड. मळवीकर यांना गौरवण्यात आले.
`संत्या कुली` या आत्मकथनात मळविकर यांचा २० वर्षांपासूनचा प्रवास असून ते जेव्हा गोवा विमानतळावर हमाली करायचे. त्यावेळच्या सर्व घटना संत्या कुलीत कथन केल्या आहेत. मातृभूमी विषयीचे प्रेम, गैरवर्तन करणाऱ्या विषयी चीड, सामाजिक न्यायासाठी अन्याविरुद्ध लढण्याची हिंमत, विचारांची स्पष्टता आणि ध्येयासाठी कष्ट आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तर अगदी सर्वसामान्य ग्रामीण कुटुंबातून आलेला तरुणही नवख्या शहरी जीवनात स्वतःचे वेगळे स्थान कसे निर्माण करू शकतो, हे या पुस्तकात वाचायला मिळते. मनोविकास प्रकाशन पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले असून ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती पंधरा दिवसातच संपली. विदर्भ, मराठवाडा, कोकणात या पुस्तकाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यातच पंढरपूर मधील बळीराजा प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा रान शिवार हा राज्यस्तरीय पुरस्कार काल मिळाल्याने संत्या कुलीच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला. महाराष्ट्रातील ६ साहित्यकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment