उत्कृष्ट वाचक म्हणून निवड झालेल्या व्यक्तींना सन्मानपत्र देताना जी एस पाटील, सोबत मान्यवर
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचा १३ वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात पार पडला.
यंदाचे "उत्कृष्ट वाचक" म्हणून शिवाजी रामा पाटील व किशोर देवजी कांबळे यांचा तर वाचनालयाला वर्षभर वर्तमानपत्र देणारे कु. निशांत नरसू पाटील, अरविंद लक्ष्मण कोकितकर सर , एम. बी पाटील सर व उपसरपंच संभाजी राणबा पाटील यांचा तसेच गेल्या वर्षभरात ज्यांनी वाचनालयाला पुस्तके, साप्ताहिक, पाक्षिक, मासिके देऊन तसेच वस्तू रुपात मदत केलेली आहे अशा व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संदीप यल्लाप्पा पाटील ( शिवाजी गल्ली) यांनी भेट दिलेल्या साहित्यिकांच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दीपक कालकुंद्रीकर यांनी पुणे येथील रहिवासी कुबल यांनी दिलेली १९ पुस्तके वाचनालयाला प्रदान केली.
याप्रसंगी खेडूत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जी. एस. पाटील तर संचालकपदी निवड झालेले एन. के. पाटील व एम .बी. यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झेवियर क्रुझ, ए. के. पाटील, जी. एस. पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी व सदस्य, वाचक, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष के. जे. पाटील यांनी केले, प्रास्ताविक प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले. सुत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले. शिवाजी खवणेवाडकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment