भाषेच्या विद्यार्थ्यांनी चौफेर वाचन करून व्यक्तिमत्व विकास साधावा - प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल, हिंदी विभागाच्या तृतीय वर्ग विद्यार्थ्यांना शुभेच्छा - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2025

भाषेच्या विद्यार्थ्यांनी चौफेर वाचन करून व्यक्तिमत्व विकास साधावा - प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल, हिंदी विभागाच्या तृतीय वर्ग विद्यार्थ्यांना शुभेच्छा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी खूप संधी उपलब्ध असून त्यांनी चौफेर वाचन करून आपले व्यक्तिमत्व  विकसित करावे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच व्यवहारज्ञानाचे कौशल्य आत्मसात करावे. त्याचबरोबर सुजान नागरिक बनण्यासाठी विविध कौशल्य प्राप्त करून सृजनशील व उच्च संस्कारित व्यक्तिमत्व घडवावे असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी केले. येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या तृतीय वर्ग विद्यार्थ्यांच्या  शुभेच्छापर कार्यक्रमात बोलत होते.

     प्रास्ताविक हिंदीविभाग प्रमुख डॉ. एस. एन. पाटील यांनी करून हिंदी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या  विविध उपक्रमांचा आढावा घेऊन ते,म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणातील विविध क्षेत्रे पादाकांत करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे व आपले करिअर घडवावे.

     यावेळी प्रा. सुहास कुलकर्णी, डॉ. एन. के. पाटील, डॉ. एस. एस. सावंत, इंदुताई कांबळे, कविता कट्टी, भारती साठे, सुप्रिया पाटील, सानिका चंदनवाले, यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पुनम गावडे हिने केले. आभार डॉ. रंजना कमलाकर यांनी मानले. या कार्यक्रमाला, प्रा. ए. डी. कांबळे, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एस. डी. गावडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment