चंदगड / प्रतिनिधी
राजे गृप बुजवडे (ता. चंदगड ) यांच्या वतीने खास शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने मंगळवार दि २९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील एकमेव महान ऐतिहासिक पोवाडा नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
चंदगड तालूक्यात एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने राजे गृप शिवजयंती महोत्सव साजरा करतो. गावातील सर्व अबाल वृद्ध व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत हा उत्सव खूप मोठ्याने साजरा केला जातो. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी लेझिम, ऐतिहासिक नृत्य सादर करत शिवरायांना मानवंदना देतात. गावात रांगोळीचा सडा टाकला जातो. रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहिर रंगराव पाटील व कोल्हापूरातील २५ कलाकारांचा सहभाग असलेला पोवाडा व नाट्य प्रयोग रंगणार आहे. राजे गृपच्या वतीने आयोजित या गाथा शिवशाहीच्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन राजे गृप बुजवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment