राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत चंदगड तालुक्यात आरोग्य तपासणी मोहीम - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2025

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत चंदगड तालुक्यात आरोग्य तपासणी मोहीम

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कृती आराखडा अंतर्गत आश्रम शाळा कोवाड येथे विद्यार्थ्यांची तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
   राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शासनाकडून १०० दिवसीय  कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय विभाग व सहाय्यक संचालक इ. मा. बहुजन कल्याण कोल्हापूर यांच्या सहकार्याने जिल्ह्यात या मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे.
    चंदगड तालुक्यातील या उपक्रमाची सुरुवात आश्रम शाळा कोवाड येथील मुलांची आरोग्य तपासणी करून करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व मुलांचे एचबी, ब्लड ग्रुप, सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या व आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिवराज कुपेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, आरबीएसके चे नोडल ऑफिसर डॉ. योगेश पवार व डॉ. स्नेहल पाटील, यांच्यासह आरोग्य तपासणी पथकात औषध निर्माता रुचिता बांदेकर व कृष्णदत्त परीट, परिचारिका छाया पुजारी, अंबुलन्स चालक सुनील कांबळे, अनिल नांदवडेकर, कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे लॅब टेक्निशियन प्रशांत वेदपाठक, संध्या, तुषार मगदूम आदींचा समावेश होता. मुलांच्या संपूर्ण आरोग्य तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी यांनी यावेळी उपस्थित मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना आरोग्य व आहार विषयक मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment