कोवाड येथे आज दि. २९ रोजी सायंकाळी निकाली कुस्त्यांचे मैदान - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2025

कोवाड येथे आज दि. २९ रोजी सायंकाळी निकाली कुस्त्यांचे मैदान


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   कोवाड तालीम संघ, बलभीम व्यायाम मंडळ व कोवाड ग्रामस्थांच्यावतीने आज मंगळवार दि. २९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. रणजीत नगर कोवाड तालुका चंदगड येथे होणाऱ्या आखाड्याचे पूजन वस्ताद शंकर पाटील व  कल्लाप्पा चोपडे यांच्या हस्ते होणार असून फोटो पूजन अजित व्हन्याळकर व काशिनाथ कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. 
  मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पै. रवी ठोंबरे  व उत्तर प्रदेश केसरी अनुज ठाकूर यांच्यात होणार असून यावेळी मैदानात एकूण ५० चटकदार कुस्त्या होणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री भरमूआण्णा पाटील,आमदार शिवाजीराव पाटील,  माजी आमदार राजेश पाटील, हेमरस युनिट हेड संतोष देसाई, अथर्व कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे, माजी जिप सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मैदानाचा लाभ कुस्ती शौकिनांनी घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment