माणसं जोडणारं व्यक्तिमत्व : शिनोळी खुर्द येथील कै. ह. भ. प. मारुतीराव खांडेकर
आज तेरावा स्मृतिदिन
माणसं मिळवा, मग सर्व काही मिळवता येईल..., या विचाराने संपूर्ण हयात जगलेले शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते व ह.भ.प. मारुतीराव लक्ष्मण खांडेकर यांचा मंगळवारी (दि. 29) एप्रिल 2025 रोजी बारावा स्मृतिदिन आहे. त्यानी जागवलेला व्यापार धर्म आणि त्यातून उभारलेला मित्रपरिवार, सांप्रदाय परिवार खूप मोठा आहे. नव्या पिढीला त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. आजच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा सी. एल. न्यूज ( चंदगड लाईव्ह न्यूज ) ने
दिलेला उजाळा....
मारुतीराव हे 29 एप्रिल 2013 ला स्वर्गवासी झाले, मात्र त्यांच्या कार्याने ते आजही शिनोळी खुर्द, तसेच उचगाव परिसरातील अनेक सांप्रदायिक चळवळीमधल्या लोकांच्या हृदयात आहेत. मनमिळावू स्वभाव आणि माणसं जोडण्याचा छंद त्यांना मोठा होता. त्यामुळेच ते सामाजिक, सांप्रदायिक, व्यवसायिक क्षेत्रात खूप पुढे गेले होते. ते विठ्ठलाचे निसिम भक्त होते. उचगाव येथील सांप्रदाय मंडळाचे ते पदाधिकारी होते. शिनोळी खुर्द वासियांच्या मालकीचा पंढरपुरात मठ उभारण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ह. भ. प. मारुतीराव हे शिनोळी खुर्द येथील यशवंत सेवा संस्थेत सुरुवातीपासूनच अनेक वर्षे सचिव म्हणून काम केले होते.
1962 च्या दरम्यान बेळगाव किल्ला मार्केट येथे व्हेजिटेबल शॉप सुरू करून त्यानी व्यवसायाला सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी प्रामाणिकपणाने व्यापारधर्म पाळला, यामुळेच ते व त्यांच्या कुटुंबीयातील सदस्य विविध व्यवसायात पुढे गेले. सध्याच्या बेळगाव होलसेल व्हेजिटेबल मार्केटमध्ये त्यांचे दुकान आहे. मारुतीराव यांच्या यशस्वी जीवनाच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी शांता खांडेकर यांचाही मोलाचा वाटा आहे. यानंतर 1994 मारुतीराव यांच्या मार्गदर्शनाखाली शिनोळी येथे स्टील विक्री व्यवसायाला प्रारंभ केला. काही काळ त्यानी स्टील उत्पादनही केले होते. यानंतर पेट्रोल पंप ही सुरू केले. त्यांचे मोठे सुपुत्र अजित खांडेकर हे व्यवसाय आणि शेती व्यवसायात प्रामाणिकपणे काम करत वडिलांचा वारसा पुढे नेत आहेत. तर लहान सुपुत्र प्रभाकर खांडेकर हे समाजकारण आणि राजकारणात कार्यरत आहेत. प्रभाकर यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच ते बेळगाव येथील होलसेल व्हेजिटेबल मार्केट असोसिएशनचे ते संचालक, शिनोळी खुर्द येथील श्री देव चव्हाटा सहकारी संस्थेचे चेअरमन, गडहिंग्लज बाजार समितीचे संचालक, चंदगड येथील संजय गांधी निराधार योजनेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत समाजसेवेचा वसा पुढे नेत आहेत. त्यांच्या कन्या मालूताई या तुडये (ता. चंदगड) येथे तर निंगुला या बीजगर्णी (ता. बेळगाव ) येथे आपापल्या सासरी त्यांच्या व्यवसायात स्थिरस्थावर झाल्या आहेत.
ह. भ. प. मारुतीराव यांच्यामुळेच आज हे कुटुंब शिनोळी खुर्द येथे कॉम्प्लेक्स, होलसेल व्हेजिटेबल, हॉटेल व्यवसाय, स्टील व्यवसायात वेगळेपणा जपून नाव कमवत आहे. आज 12 व्या स्मृतिदिनानिमित्त ह. भ. प. मारुतीराव लक्ष्मण खांडेकर यांना चंदगड लाईव्ह न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !
No comments:
Post a Comment