होसूर ते बेकिनकेरे रस्त्यावर अचानक चाळोबा गणेश हत्ती - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2025

होसूर ते बेकिनकेरे रस्त्यावर अचानक चाळोबा गणेश हत्ती

 


कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

      आजरा येथील चाळोबा मंदिर परिसरातील जंगल क्षेत्रातून शट्टीहळी ते किटवाड मार्गे बेळगाव तालुक्याच्या सीमेवरील अतिवाड मधून महिपाळगड (ता. चंदगड) जंगलात स्थिरावलेल्या चाळोबा गणेश हत्तीने मंगळवारी (दि. 29) सायंकाळी 8 वाजता अतिवाड फाटा येथे उचगाव ते कोवाड या मुख्य रस्त्यावर अचानकपणे दर्शन दिल्याने वाहनधारकांचा भीतीने गोंधळ उडून गेला. 

अचानकपणे समोर आलेल्या हत्तीमुळे प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. यादरम्यान काही वेळ बेळगाव ला जाणारी वाढला जाणारी वाहतूक थांबवली होती. या भागात आठ दिवस  हत्तीचा मुक्त संचार सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण आहे.  आधीच रात्रीच्या वेळी सायंकाळी दुचाकी चालकांची संख्या रोडावली आहे. या ठिकाणी काही हॉटेल्स व नाष्टा सेंटर आहेत. त्यामुळे येथे सायंकाळी येण्यासाठी ग्राहकाकडून टाळण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकरी तसेच ग्रामस्थांनी घरी बांधून वास्तव्य केले आहे. त्यांनाही या भीतीमुळे हत्तीमुळे नवी समस्या निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment