चिंचणे येथे पाचशे वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड पाळीव जनावरांच्या गोठ्यावर कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2025

चिंचणे येथे पाचशे वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड पाळीव जनावरांच्या गोठ्यावर कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही

दुर्गाडी देवस्थानचे पाळीव जनावरांच्या गोठ्यावर पडलेले पाचशे वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

     चिंचणे (ता. चंदगड) येथे वादळ वाऱ्याने मंगळवारी (दि. 29) दुपारी 12:30 वाजता अचानकपणे पाचशे वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड पाळीव जनावरांच्या गोठ्यावर पडून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेमध्ये जीवित हानी झाली नाही. 

ह्या झाडाची मधून फूट पडून बुंध्यापासून निम्मे झाड भेकलून शेजारील गोठ्यावर पडले. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही.  चिंचणे येथे मध्यवर्ती भागात दुर्गाडी देवस्थानचे सदर झाड आहे. या घटनेमध्ये विठ्ठल केंपण्णा पाटील व शंकर केंपण्णा पाटील यांच्या गोठ्याचे शेड, लोखंड, पत्रे मोडून  दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  घटनास्थळी तातडीने भेट देत तलाठी प्रशांत पाटील, कोतवाल मारुती पाटील, सरपंच संतोष पाटील माजी उपसरपंच किरण पाटील पोलीस पाटील बाळू व्हंकळी, ग्रामसेवक दत्ता नाईक यांनी पंचनामा करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. या कुटुंबाला त्वरित प्रशासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment