![]() |
चुडामणी रामू पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवासी, केडीसीसी बँकेचे निवृत्त कॅशियर चुडामणी रामू पाटील (वय ७५) यांचे दीर्घ आजारपणामुळे दि. २९/०४/२०२५ रोजी सायंकाळी निधन झाले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंदगड तालुक्यातील विविध शाखांमध्ये त्यांनी क्लार्क व कॅशियर म्हणून उल्लेखनीय कार्य केले होते. बँकेत आलेल्या ग्राहकांशी आदराने वागत असल्याने त्यांच्याबद्दल समाजात एक वेगळा आदरभाव होता. दौलत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक रामू पाटील यांचे ते जेष्ठ बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. कालकुंद्री स्मशानभूमीत त्यांच्यावर आज दि. ३० रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment