महागोंड ते होन्याळी मार्गावर खुदाई, प्रवास धोक्यात, प्रवासी व वाहनधारकांतून संताप - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2025

महागोंड ते होन्याळी मार्गावर खुदाई, प्रवास धोक्यात, प्रवासी व वाहनधारकांतून संताप

  


आजरा : सी एल वृत्तसेवा

   सध्या पावसाळा तोंडावर असताना आजरा तालुक्यातील महागोंड ते होन्याळी मार्गावरील वळणावर केलेली चर खुदाई प्रवासी व वाहनधारकांसाठी जीवघेणी ठरत आहे. पावसाचे दिवस जवळ आलेले असताना संबंधित बांधकाम विभागाने अशी चर खुदाई करण्यास परवानगी दिलीच कशी? खुदाई केलेली असेल तर रस्ता पुर्ववत डांबरीकरण करण्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल परिसरातील ग्रामस्थ, प्रवासी व वाहनधारक करत आहेत.

     पाण्यासाठी खोदलेला हा पाण्याचा चर महागोंड - होन्याळी सिमेलगत असून तो दिवसेंदिवस खोल व धोकादायक बनत चालला आहे. येथे काँक्रीटीकरण करून रस्ता तात्काळ निरोधक करावा. जर  या ठिकाणी कोणताही अपघात झाल्यास  सर्वस्वी पाण्याचे काम करणारे ठेकेदार व बांधकाम खात्याला जबाबदार धरावे. अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment