निट्टूर येथे श्रीराम मंदिर व श्री लक्ष्मी मंदिर उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2025

निट्टूर येथे श्रीराम मंदिर व श्री लक्ष्मी मंदिर उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 
     निट्टूर (ता. चंदगड) येथे भाविक व ग्रामस्थांच्या देणगीतून जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्रीराम व श्री लक्ष्मी मंदिराचा उद्घाटन सोहळा व कळसारोहन सोहळा विविध धार्मिक विधींसह उत्साहात संपन्न झाला. 

   पुरोहित जयवंत नाईक लकिकट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, हरिपाठ असे कार्यक्रम पार पडले. मूर्ती प्राणप्रतिष्ठा व दि. ६/५/२०२५ रोजी झालेल्या महाप्रसाद कार्यक्रमास मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment