कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
निटटूर (ता. चंदगड) येथील नरसिंह हायस्कूल मधील श्रेया नामदेव पाटील या विद्यार्थिनीने दहावी बोर्ड परीक्षेमध्ये 89 टक्के गुण संपादन करून गावातील दोन्ही हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
याशिवाय नेहा गणपत पाटील 87 टक्के, प्रतीक्षा संभाजी पाटील 84 टक्के गुण संपादन करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले.
![]() |
निटटूर : श्रेया नामदेव पाटील हिचा सत्कार करताना कृष्णा बामणे. शेजारी गुणवंत विद्यार्थिनी नेहा पाटील, प्रतीक्षा पाटील यांच्यासह नामदेव पाटील, संभाजी पाटील, मारुती पाटील आदी मान्यवर. |
या विद्यार्थिनींना नरसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक एन आर पाटील व वर्गशिक्षक जे जे मोमीन यांचे मार्गदर्शन लाभले. श्रेया ही गावातील जय शिवराय विकास संस्थेचे माजी संचालक नामदेव पाटील व चंदगड तालुका भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सुप्रिया नामदेव पाटील यांची कन्या आहे.
या यशस्वी विद्यार्थिनींचा नाभिक समाज पदाधिकारी कृष्णा बामणे, भाजपचे निटूर येथील अध्यक्ष संभाजी पाटील, गावातील जय शिवराय विकास सोसायटीचे संचालक मारुती विठोबा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी एम. पी. पाटील, प्रवीण पुजारी, संदीप कांबळे, शंकर पाटील, दशरथ पाटील, शिवाजी पाटील, नामदेव पाटील, विद्याधर पाटील, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment