चंदगड : सी एल वृत्तसेवा
मौजे गिजवणे (ता. चंदगड) येथील श्री लक्ष्मी सहकारी दूध व्याय. संस्था मर्या. गिजवणे या संस्थेतील भ्रष्टाचारासंदर्भातील विविध मागण्यांसाठी शुक्रवार दि. ६ जून २०२५ रोजी तहसिलदार कार्यालय गडहिंग्लजते प्रांत कार्यालय (उपविभागीय कार्यालय) येथे "संघर्ष मोर्चा" काढून आंदोलन करणार असल्याची माहिती मोर्चाचे संघटक संग्राम सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
या प्रश्नी उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालावे. यासाठी त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने मौजे गिजवणे येथील श्री लक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या भ्रष्टाचारासंदर्भातील विविध मागण्यांसाठी लोकांनी व संघटनेने संबंधितांना निवेदन व अर्ज दिलेले आहेत. याकडे संस्थेने दुर्लक्ष करत माहिती दिलेली नाही. त्यामुळेच या संस्थेच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी शुक्रवारी तहसिलदार कार्यालय ते प्रांत कार्यालय गडहिंग्लज येथे "संघर्ष मोर्चा" काढून आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय किसान सभा दूध उत्पादक संघर्ष समितीचे मुख्य संघटक संग्राम सावंत यांनी दिली आहे. प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर सागर शिंदे, गणेश कळेकर, मानतेस बन्ने, जनार्दन तोडकर, स्वप्निल कोरी, विजय कडूकर आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment