'फेसबुक फ्रेंड सर्कल'चा अनोखा उपक्रम : विद्यार्थ्यांना छत्र्या आणि शालेय साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2025

'फेसबुक फ्रेंड सर्कल'चा अनोखा उपक्रम : विद्यार्थ्यांना छत्र्या आणि शालेय साहित्य वाटप


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    शैक्षणिक गुणवत्ता आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेले दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड हे शिक्षणाचे केंद्र विविध खेड्यांमधील मुलांना ज्ञानाची कवाडे उघडून देत आहे. या विद्यालयात काजिर्णे धनगरवाडा आणि इतर १८ ते २० खेड्यांतील विद्यार्थी दररोज पावसात, जंगलातून आणि खडतर रस्त्यांवरून पायी प्रवास करून येतात.

        या विद्यार्थ्यांची स्थिती ओळखून, फेसबुक फ्रेंड सर्कल, बेळगावचे प्रमुख संतोष दरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक भान जपत पुढाकार घेतला. संजय साबळे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना छत्र्या आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

        या उपक्रमांतर्गत संगीता यमकर, समृद्धी यमकर, सुवर्णा पाटील, अजय पाटील, रूपाली यमकर, दयानंद यमकर, भारती पाटील, सरिता पाटील, भरत यमकर, सायली कांबळे, सारा तारळेकर, साची तारळेकर, समृद्धी फाटक, राजेश वरद या विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळाला.

        या वेळी प्राचार्य आर. पी. पाटील, उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, टी. व्ही. खंदाळे, पुष्पा सुतार, शरद हदगल, ओंकार पाटील, अमित पाटील यांची उपस्थिती होती. अंधारात आशेचा दीप ठरलेला हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरतोय.

No comments:

Post a Comment