कागणी येथील निवृत्त शिक्षक रामा भोगण यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2025

कागणी येथील निवृत्त शिक्षक रामा भोगण यांचे निधन

रामा भोगण

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

    मूळचे कागणी (ता. चंदगड) येथील व सध्या विश्वपंढरी, संभाजीनगर, कोल्हापूर येथील रहिवासी रामा सटूप्पा पाटील (वय 85) यांचे सोमवारी (दि. 23) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते निवृत्त माध्यमिक शिक्षक होते. कागणी येथे भव्य महालक्ष्मी मंदिर उभारणीसाठी मदत करण्यात ते अग्रेसर होते.  कोल्हापूर महानगरपालिका शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका सुनंदा भोगण यांचे ते पती होय. कालकुंद्री (ता. चंदगड) येथील इंजिनियर संग्राम पाटील यांचे ते सासरे तर निवृत्त प्राचार्य ए. एस. जांभळे यांचे ते मेहुणे होय.

No comments:

Post a Comment