खालसा म्हाळुंगे येथील इको केन शुगर एनर्जीमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2025

खालसा म्हाळुंगे येथील इको केन शुगर एनर्जीमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

तुडये / सी. एल. वृत्तसेवा

  खालसा म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील इको केन शुगर एनर्जी प्रा. लि. येथे जागतिक पर्यावरण दिन कारखान्याचे स्थळी साजरा करण्यात आला. जनरल मॅनेजर सुनिल पाटील हे प्रमुख उपस्थित होते. 

    या कार्यक्रमावेळी श्री. पाटील यांनी पर्यावरणामध्ये होणारा ऱ्हास, त्यामुळे होणारे बदल व होणारे परिणाम कसे थांबवता येईल. झाडे जगवा व ती जातीने लक्षपूर्वक जगवा. पर्यावरण रक्षणासाठी एकतरी झाड जगवलेच पाहिजे असून सांगून पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. 

    यावेळी कारखान्याचे सचिन पाटील (H.R.so), मनोज साकीया (C.C.so), प्रकाश पाटील (H.T.K.so), मोरेश्वर गुरव (C.Engg), राजन गावडे (Engg), मल्लेश गौडर (Instiurament Engg), शशिकांत बिर्जे (Asst.En), सर्जेराव विरले, चंद्रशेखर तारळे (S.O), सागर पाटील यांच्यासह तसेच इतर विभागातील सर्व खातेप्रमुख, कामगार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment