आजरा : गोपाळ गडकरी/ सी एल न्यूज
आजरा येथील रवळनाथ, शिव कॉलनी, आयडीयल कॉलनी येथे बस थांबा व्हावा. यासाठी आजरा अन्याय निवारण समितीने राज्य परिवहन मंडळाला लेखी पत्र दिल्यानुसार बस थांबा सुरु करणेसाठी दि. ६ मे रोजी राज्य परिवहन प्रशिक्षण बसद्वारे पाहणी करण्यात आली. या पाहणीनुसार रवळनाथ कॉलनीच्या तिट्ट्यावर म्हणजेच भडगावकर वेल्डिंग वर्क्स गांधीनगर रोड या ठिकाणी बस थांबा मंजूर करण्यात आला. आजरा अन्याय निवारण समितीच्या प्रयत्नांना आलेले हे यश आहे.
या मार्गावर जाणाऱ्या लाटगांव, विटे, एरंडोळ बस सतत ये जा करत असतात. त्यामुळे राईस मिल व दवाखाना गांधीनगर बस थांबा होता. तरी अन्याय निवारण समितीचे परशराम बामणे आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नाला यश आले.
समर्थ कॉलनी, रवळनाथ कॉलनी, शिव कॉलनी तसेच आयडियल कॉलनीतील रहिवाशीयांना सरकारी दवाखाना किंवा आजरा बस स्टँडला जाण्यासाठी अडचण व गैरसोय होती. यासाठी रवळनाथ कॉलनीजवळ विनंती बस थांबा सुरु करण्याबाबत लेखी निवेदन अन्याय निवारण समितीने दिले होते. त्यानुसार विभाग नियंत्रक राज्य परिवहन कोल्हापूर यांनी लेखी पत्र काढून रवळनाथ कॉलनी तिट्ट्याजवळ बस थांबवून प्रवासी चढउतार करणेबाबत सूचना दिल्या. याठिकाणी विनंती बस थांबा फलक देऊन योग्य ठिकाणी लावणेबाबत सूचित करण्यात आले. अन्याय निवारण समितीच्या या विधायक कार्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment