जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माणगाव येथे माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपन - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2025

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माणगाव येथे माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपन

  


तेऊरवाडी : सी एल वृत्तसेवा

    जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवार दि. ५ जून रोजी श्री शिवाजी हायस्कूल माणगाव (ता. चंदगड) येथे माजी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपन केले.

   शाळेच्या नवीन इमारती समोर असणाऱ्या जागेत वड, पिंपळ यासारख्या वृक्षांचे वृक्षारोपन अर्थव अनिल सुरुतकर, विक्रांत अशोक कांबळे, विनायक नंदकुमार चव्हाण, जयंत संजय हारकारे, महादेव विलास सावंत, तेजस राजाराम कुंभार, रोहन महादेव होनगेकर यांनी केले. यावेळी  हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment