सौ. सुवर्णा सावंत यांनी स्वीकारला माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर पदाचा कार्यभार - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2025

सौ. सुवर्णा सावंत यांनी स्वीकारला माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर पदाचा कार्यभार

आजरा : सी. एल. वृत्तसेवा 

     कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून  सौ. सुवर्णा शिवाजी सावंत या रुजू झाल्या. माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांची शिक्षण विभाग योजनाचे शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर सौ. सुवर्णा सावंत यांची नियुक्ती झाली आहे. 

    सौ. सावंत यांनी मंगळवारी  (३  जून २०२५) शिक्षणाधिकारी आंबोकर  यांच्याकडून  पदभार स्वीकारला. सौ. सुवर्णा सावंत या रत्नागिरी जिल्हा परिषद येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी होत्या. यापूर्वी सावंत यांनी रत्नागिरी पंचायत समिती येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले आहे. कोल्हापुरात त्यांनी विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदावर यापूर्वी काम केले आहे. कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल येथे त्या प्राचार्य होत्या. यासह कागल, पन्हाळा, गगनबावडा पंचायत समिती येथे गटशिक्षणाधिकारी पदाचा  कार्यभार सांभाळला होता.  कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ येथे सहाय्यक सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

No comments:

Post a Comment