शिक्षण विस्तार अधिकारी एन. व्ही. पाटील यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा, चंदगड, गडहिंग्लज, शिरोळ तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2025

शिक्षण विस्तार अधिकारी एन. व्ही. पाटील यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा, चंदगड, गडहिंग्लज, शिरोळ तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती

   


कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

       पंचायत समिती चंदगड चे शिक्षण विस्तार अधिकारी नारायण विठोबा पाटील तथा एन. व्ही. पाटील हे आपल्या ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. या निमित्त त्यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार व सदिच्छा सोहळा १ जून २०२५ रोजी रणजीत देसाई सांस्कृतिक भवन, कोवाड (ता. चंदगड) येथे पार पडला. 

    शिक्षक समितीचे चंदगड तालुकाध्यक्ष धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शिक्षक समितीचे राज्य नेते शंकर मनवाडकर व मान्यवरांच्या हस्ते एन. व्ही. पाटील व सौ मंगल नारायण पाटील दांपत्याचा सत्कार करण्यात आला. 

    कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना गोविंद पाटील यांनी नारायण पाटील यांच्या ३९ वर्षातील शैक्षणिक सेवेचा व संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला.

    यावेळी शंकर मनवाडकर, शिक्षक समितीचे माजी जिल्हाध्यक्ष ज्योतीराम पाटील, माजी जि प सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण, माजी पंचायत समिती सभापती यशवंत सोनार, माजी शिक्षक बँक संचालक सुनील एडके, एम. जे. पाटील, बी. एम. पाटील, एम. टी. कांबळे, शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट तालुकाध्यक्ष शिवाजी शंकर पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. 

   सत्कारमूर्ती एन व्ही पाटील यांनी आपल्याला विद्यार्थी दशेत मार्गदर्शन करून घडवलेल्या शिक्षकांचे स्मरण केले. यावेळी आपल्याला शिक्षक होण्यासाठी प्रोत्साहन दिलेले कोवाड येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक गुरुवर्य बी. एस. अंगडी (माजी शिक्षण विस्तार अधिकारी गडहिंग्लज) यांचा यथोचित सन्मान केला.

    यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती बंडोपंत चिगरे, माजी जि प सदस्य शंकरराव आंबेवाडकर, अशोक जोतिबा पाटील (तेऊरवाडी), शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर मुतकेकर, डी. आय. पाटील, शोभा देसाई, सुनिता पाटील, शिवाजी विद्यापीठ भौतिकशास्त्र विभाग चे डॉ. एन, एल, तरवाळ, पारगड शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन मंगल नौकुडकर, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष वसंत जोशीलकर

    शिक्षक बँक संचालक बाबुराव परीट, वाय. बी. पाटील, उपसरपंच प्रकाश दळवी, मनीषा पाटील सरपंच तेऊरवाडी,  सुरेश पाटील, विनायक मगदूम, अण्णा मुंडे, जाधवर, यशवंत पेठे, सुभाष कुरुंदवाडे, संजय कदम, रईस पटेल, इरफान पटेल, बाळू पवार आदींसह चंदगड, गडहिंग्लज व शिरोळ तालुक्यातील मान्यवर, शिक्षक, शिक्षक समितीचे कार्यकर्ते, पाटील यांचे नातेवाईक, कुटुंबीय व तेऊरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण साळुंखे व विनायक गावडा यांनी केले.  आनंद पाटील निट्टूर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment