चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
नांदवडे (ता. चंदगड) येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या श्री भावेश्वरी विद्यालयामध्ये सातवीतून आठवी प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचबरोबर इतर विद्यालयातून बदली होऊन आलेल्या शिक्षकांचेही शालेय समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. विद्यालयाच्या शालेय कमिटीचे अध्यक्ष रामाणा पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
प्रवेशोत्सवावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम पवार यांनी `विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असेल. याला विद्यार्थ्यांनीही त्याला उत्तम प्रतिसाद देत आपली प्रगती करुन घ्यावी. जेणेकरुन शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीला फळ येईल अशी सुचना केली.``
ॲड. संतोष मळवीकर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्याकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन करावे. विद्यालयाचे नाव जिल्ह्यात नव्हे तर राज्यात झळकविण्यासाठी शिक्षकांसह विद्यार्थांनीही मेहनत घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी शालेय कमिटी अध्यक्ष रामाणा पाटील, सदस्य सटुप्पा शिंदे, ॲड. संतोष मळवीकर, नांदवडेचे सरपंच राजेंद्र कांबळे, संपत पाटील, दयानंद गावडे, राजेंद्र कुट्रे यांच्यासह मुख्याध्यापक उत्तम पवार, सहाय्यक शिक्षक पी. एम. कांबळे, सुजाता कोरवी, डी. जे. पाटील, शिपाई गुलाब कांबळे व हणमंत गावडे यांच्या हस्ते आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांना पुष्प देवून त्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment