चंदगड : माडखोलकर महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2025

चंदगड : माडखोलकर महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती जाहीर


चंदगड / सी एल वृत्तसेवा

  येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना   शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती नुकताच जाहीर झाली.

     शिवाजी विद्यापीठ दरवर्षी विविध महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठामार्फत गुणवत्ता शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येते. 2024 -25 या शैक्षणिक कालावधीमध्ये महाविद्यालयातील खालील विद्यार्थी गुणवत्ता शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. यामध्ये नयन नंदू गावडे (बी. ए.), मिश्रकोटी अक्षता उदय  (बीएससी), नार्वेकर दिनकर पांडुरंग (बीएससी), नार्वेकर सलोनी विठ्ठल (बीएससी), कांबळे तेजस्विनी सुनील(बीए), चांदेकर सुजय नंदकुमार (बीएससी), गडकरी श्रेयस प्रदीप (बीसीए) या ७ विद्यार्थ्यांचा गुणवत्ता शिष्यवृत्ती मध्ये समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यापीठांमध्ये गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळण्याची परंपरा महाविद्यालयाने जपली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल सदर विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment