चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मूळचे शिवणगे (ता. चंदगड) व सध्या रक्षक कॉलनी, विजयनगर, बेळगाव स्थित निवृत्त प्राचार्य एस. एस. पाटील उर्फ संतराम शंकर पाटील (वय 94) यांचे रविवारी (दि. 15) बेळगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. 16) सकाळी होणार आहे. त्यांच्यावर रविवारी सायंकाळी बेळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रा. नितीन पाटील व अभियंता प्रमोद पाटील यांचे ते वडील होत.
एस. एस. पाटील यांनी ताम्रपर्णी विद्यालय (शिवणगे), महात्मा फुले विद्यालय व गुरुवर्य म.भ. तुपारे ज्युनिअर कॉलेज ( कार्वे ) व दि न्यू इंग्लिश स्कूल (चंदगड ) येथे प्राचार्य म्हणून काम केले होते. खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्रीचे ते ज्येष्ठ संस्थापक सदस्य, मार्गदर्शक व उत्तम प्रशासक होते.
No comments:
Post a Comment