चंदगड : माडखोलकर महाविद्यालयामध्ये संगणकशास्त्र विभागाच्या वतीने BCA. ReCET रजिस्ट्रेशन सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2025

चंदगड : माडखोलकर महाविद्यालयामध्ये संगणकशास्त्र विभागाच्या वतीने BCA. ReCET रजिस्ट्रेशन सुरू

 


चंदगड / सी एल वृत्तसेवा

   येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये संगणकशास्त्र विभागाच्या वतीने BCA. ReCET रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे.

  येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये गेली पंधरा वर्षाहून अधिक काळ संगणक शास्त्र विभाग कार्यरत आहे, या विभागातून शेकडो पदवी संपादन केलेले विद्यार्थी विविध नामांकित (MNC's)आयटी कंपनीमध्ये उच्च पदस्त कार्य करत आहेत. महाविद्यालयामध्ये सुरू असणाऱ्या AICTE अंतर्गत BCA कोर्सला प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा देणे ऐच्छिक आहे. सदर सीईटी परीक्षेचे रजिस्ट्रेशन महाविद्यालयात मोफत सुरू आहे. दिनांक 12 जून ते 20 जून या कालावधीत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी 8055495161, व 9404123080 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य एस. डी. गोरल व प्रा.आर. व्ही आजरेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment