![]() |
कुदनुर येथील कारगिल विजय दिवस कार्यक्रमात बोलताना निवृत्त सुभेदार मेजर राजाराम मोहनगेकर |
कुदनूर : सी एल वृत्तसेवा
आपल्या भारत देशात दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. १९९९ मध्ये याच दिवशी भारत आणि पाकिस्तानमधील ३ महिने चाललेले युद्ध संपले. यात भारताचा विजय झाला. या धर्तीवर कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला देशाच्या शूर सुपुत्रांच्या अदम्य धैर्याची, शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची आठवण करून देतो. हा दिवस आपल्याला केवळ अभिमानाने भारून टाकत नाही; तर देशाचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे. याची आठवण करून देतो. अशी माहिती देत -030 डिग्री सेंटीग्रेट तापमान ला काम करताना शरीरातील रक्त, हाडे गोठून जातात. असे प्रतिपादन माजी सैनिक सुभेदार मेजर राजाराम महादेव मोहनगेकर यांनी आपल्या मनोगतात केले. कुदनुर येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूल येथे आयोजित कारगिल विजय दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. जी. पाटील होते.
"हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या जरासे राहू द्या..!" या शब्दातून देशाविषयीचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आणखी सैनिक म्हणून ज्या दिवशी भरती होतो त्या दिवशी आपला कुटुंबाचा प्रवास तिथेच थांबून देशाविषयीचा प्रवास सुरू होतो. आपला देश हेच कुटुंब म्हणून प्रत्येक क्षण हा देशासाठी वाहीला जातो. आपला प्राण हातामध्ये घेऊन देशाच्या सीमेवरती शत्रूशी दोन हात करताना फक्त देशाविषयीचे प्रेम हेच आपल्या अंतर्मनात, रक्तात सळसळत असते. सैनिकी जीवन हा खडतर प्रवास कोणत्या पद्धतीने सुरू होतो. तर शासनाच्या सुविधा आणखी सैनिकाचे कर्तव्य स्पष्ट शब्दात सांगत सैनिक म्हणून कार्य करताना आपले हृदय अभिमानाने भरून येते. असे सैनिकाचे भावनिक विचार गणपती कुट्रे (हवालदार) यांनी व्यक्त केले.
त्यावेळच्या सुख सुविधांना आत्ताच्या सुख सुविधा यातील तफावत सांगत तेव्हाचे शिक्षण किती खडतर होते आणि त्याचे महत्त्व त्याप्रमाणे किती होते ह्या सर्व गोष्टी सांगत सैनिक भरतीसाठी कोणकोणत्या पद्धतीने अभ्यास करत त्यामध्ये कसे प्रयत्नशील राहून सैनिक भरती व्हावे लागते हे सर्व हितगुज वैजू कुट्रे (हवालदार) यांनी विद्यार्थ्यांशी केले.
देशासाठी कार्य करत असताना फक्त सैनिक म्हणूनच कार्य होत असताना असून आपण प्रत्येकच देशाचा एक सैनिक आहोत असं समजून आपल्या संस्कारात व आचार विचारात प्रत्येकाने आपले शब्द सांभाळले तर खरोखरच आपल्या स्वप्नातील भारत उभा राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच पर्यावरण, स्वच्छता, चांगले आचार विचार, नित्य वाचन, लहान मोठ्यांचा आदर अशा अनेक गोष्टी आपण सर्वांनी आपल्या जीवनात पाळल्या पाहिजेत. हे केले तर खरोखर प्रत्येक जण हा देशाचा सैनिक ठरेल. याची जाणीव शिवाजी निंगाप्पा ओऊळकर (ऑनररी सुभेदार मेजर) यांनी आपल्या मनोगत केली.
यावेळी सैनिक वैजू बायाप्पा कुट्रे (हवालदार), राजाराम महादेव मोहणगेकर (ऑ. सुभेदार मेजर), शिवाजी निंगाप्पा ओऊळकर (ऑ. सुभेदार मेजर),
गणपती कुट्रे (हवालदार ) यांच्या समवेत कारगिल मधील शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सूत्रसंचालन श्री. देसाई प्रास्ताविक श्री. नागेनट्टी यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment