महसुल विभागाच्या वतीने १ ऑगस्टला महसुल दिन व १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल सप्ताह साजरा होणार - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2025

महसुल विभागाच्या वतीने १ ऑगस्टला महसुल दिन व १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल सप्ताह साजरा होणार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

महसूल विभागामार्फत राज्यात महसुल मंत्र्यांच्या आदेशानुसर दिनांक ०१ ऑगस्ट, २०२५ रोजी महसूल दिन व दिनांक ०१ ते ०७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत महसूल सप्ताह २०२५ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार राजेश चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकातून दिले आहे.     

        त्याचाच एक भाग म्हणून चंदगड तालुक्यकेत या महसूल सप्ताहमध्ये प्रत्येक दिवशी समाजातील विविध घटकातील नागरीकांसाठी पुढील प्रमाणे विशेष मोहिम /कार्यक्रम / उपक्रम / शिबीरे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

१ ऑगस्ट ते ०७ ऑगस्टः चंदगड तालुक्यात विशेष महसूल सप्ताह

कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे..........

०१ ऑगस्ट, २०२५ 

"महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ"

महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी/संवाद उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्त लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ"

०२ ऑगस्ट, २०२५

"शासकीय जागेवर सन २०२१ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबांपैकी अतिकमण नियमानुकूल रिण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना सदर अतिक्रमित जागांचे पटटे वाटप करणेबाबत कार्यक्रम"

०३ ऑगस्ट, २०२५

"पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे"

०४ ऑगस्ट, २०२५

"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे"

०५ ऑगस्ट, २०२५

"विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करूनअनुदानाचे वाटप करणे"

०६ ऑगस्ट, २०२५

"शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे / सरकारजमा करणे) निर्णय घेणे"

०७ऑगस्ट, २०२५

"M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP) प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ"

No comments:

Post a Comment