![]() |
चिंचणे मधील आरोग्य शिबिरात तपासणी करताना एन. जी. ओ. चे कर्मचारी व सहभागी मान्यवर |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मराठी विद्या मंदिर चिंचणे (ता. चंदगड) येथे येथे सोशल हेल्थ केअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या एनजीओ मार्फत सकाळी १० पासून दुपारी ४ या वेळेत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबीरामध्ये बी. पी, शुगर, ई.सी.जी, डोळे तपासणी, जनरल चेकअप, छातीचे विकार, निमोनिया यासारखे सर्व आजारांची तपासणी करून आजाराचे निदान, औषध उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते.
या सर्व तपासणी करण्याकरता संत गजानन महाराज हॉस्पिटल स्टाफ, कोल्हापूर येथून वैभवलक्ष्मी रक्तपेढी केंद्राचे कर्मचारी व कृष्णाई ऑप्टिकल्स कोवाड यांचे सहकार्य लाभले.
या शिबिरामध्ये सोशल हेल्थकेअर असोसिएशनचे पदाधिकारी, चिंचणे गावचे आजी,माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती, गावातील सर्व मंडळाचे सदस्य, गावातील महिला बचत गट, शाळा व्यवस्थापन कमिटी, गावातील सर्व नागरिक असे २०० हून अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला व आपली शारीरिक तपासणी करून घेतली. सध्यस्थितीत सोशल हेल्थकेअर एनजीओ मार्फत चंदगड, आजरा, गडहिंग्लज मधील ज्या गावा मध्ये डॉक्टर्स, डायग्नोस्टिक सेंटर, मेडिकल्स या सारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्या गावामध्ये मोफत आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करत आहे. या कार्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment