कोवाड महाविद्यालयात स्वागत आणि सत्कार समारंभ संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2025

कोवाड महाविद्यालयात स्वागत आणि सत्कार समारंभ संपन्न

 

कोवाड (ता. चंदगड) येथील महाविद्यालयात सत्काराला उत्तर देताना प्रमुख पाहुणे जी. एस. पाटील व इतर मान्यवर

कोवाड / सी एल वृत्तसेवा

    कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने नवागतांचा स्वागत समारंभ आणि खेडूत शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि संचालकांचा सत्कार  सोहळा आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था सचिव एम व्ही. पाटील होते. प्रमुख पाहुणे जी. एस. पाटील खेडूतचे नवनिर्वाचित अध्यक्ष होते.

    प्रमुख उपस्थित  प्रा. एम. बी. पाटील, आर. आर. देसाई, प्रा. एन. एस. पाटील, शाहू फर्नांडिस, शामराव मुरकुटे, जी. एस. पाटील, एम. के. पाटील यांची खेडूत शिक्षण संस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सर्वोदय शिक्षण संस्थेच्यावतीने शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. 

     उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून स्वागत समारंभ संपन्न झाला. पाहुण्याची ओळख आणि प्रास्ताविक प्र. प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रा. एन. एस. पाटील मा. एम. बी. पाटील सत्काराला उत्तर देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कु. अनुजा लोहार कु.सानिका नागनवांडकर, कु. संजना होंकळी, कु. अंकिता सलामवाडकर या विद्यार्थ्यांची मनोगते झाली.

    प्रा. डॉ. ए. एस. आरबोळे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा, विविध समित्यांचे कामकाज आणि कार्य आपल्या मनोगतून मांडले.

          प्रमुख पाहुणे जी. एस. पाटील म्हणाले, ``किणी कर्यात हा भाग  पुण्यवंतांचा भाग म्हणून ओळखला जातो. कोवाड च्या पुण्यनगरीत शिकणारे आपण सगळेजण भाग्यवान आहोत. याच कर्यातीच्या मातीत स्वामींकारांचा जन्म. आपण आपल्याला मिळालेल्या संधीच सोनं करा. कोवाड महाविद्यालयांमुळे बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करण्यात आली. या परिसराला साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी लाभलेले आहे, स्वामीकार रणजित देसाई यांच्या भूमीत आपण सर्वजण शिकत आहोत. याचं भान ठेवून आपण विद्यार्थीदशेतच वेगवेगळ्या विचार प्रवाह स्वीकारून संस्कार शील बनावे आणि आपल्या कुटुंबाचे, समाजाचे, भागाचे नाव करावं. याच मातीत आम्ही प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन आज इथपर्यंत पोहोचलो आपणाला मात्र शिक्षण गंगोत्री आपल्या दारी आलेली आहे. ही सोय सर्वोदय संस्थेने केलीय याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.

    अध्यक्ष मनोगतात एम. व्ही.  पाटील म्हणाले, ``या भागाची गरज ओळखून आम्ही या संस्थेची स्थापना केलीआज हजारो बहुजन समाजाची मुलं शिक्षण घेत आहेत. आणि वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत.`` शिक्षण संस्था नव्हत्या त्यावेळेस आम्ही शिक्षण तज्ञ मंडळींनी एकत्र येऊन हा शिक्षणाचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी खेडूत आणि सर्वोदय या दोन संस्था आज बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची केंद्र म्हणून या भागात लौकिक मिळवत आहेत. 

       यावेळी संगीत खुर्ची. भक्तीगीत गायन, असे विविध उपक्रमातून मुलांची करमणूक आणि मनोरंजन करण्यात आले.

     सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाचे डॉ. ए. के. कांबळे,  डॉ.आर. डी. कांबळे, डॉ. व्ही.के. दळवी, डॉ. सुनीता कांबळे, प्रा. सौ. कणसे यानी केले.  कार्यक्रमाच्या आयोजन प्र. प्राचार्य डॉ. व्ही. आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. यावेळी सर्व अधिविभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, प्रशासकीय सेवक, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे यांनी केले. आभार प्रा. डॉ. ए. के. कांबळे यांनी मांडले. 

No comments:

Post a Comment