
कोवाड येथे रौप्य महोत्सवी कोवाड मर्चंट पतसंस्थेत उत्तम मुळीक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थित चेअरमन दयानंद मोटूरे व संचालक मंडळ.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम अपूर्व उत्साहात पार पडला. कोवाड येथील रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दि कोवाड मर्चंट पतसंस्थेत यंदा प्रथमच ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे चेअरमन दयानंद मोटुरे यांनी ध्वज पूजन केले. तर व्हाईस चेअरमन उत्तम मुळीक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व संचालक, कर्मचारी तसेच आश्रम शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कुदनूर येथे सरपंच प्रा. सौ संगीता सुरेश घाटगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत सोनार यांनी केले. यावेळी उपसरपंच अशोक वडर, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते सुरेश घाटगे यांच्यासह शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कालकुंद्री ग्रामपंचायत येथे सरपंच सौ छाया जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वज पूजन उपसरपंच संभाजी पाटील यांनी केले. हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी समूहगीते सादर केली. तंटामुक्त कमिटी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने टीबी निर्मूलन शपथ देण्यात आली. इयत्ता चौथी, दहावी व बारावी परीक्षेत गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांसह आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
ग्रामपंचायत कोवाड येथे सरपंच सौ अनिता कल्लाप्पाण्णा भोगण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. केंद्र शाळा कोवाड येथे मुख्याध्यापक जानबा अस्वले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष रामा यादव, सर्व शिक्षक, शालेय विद्यार्थी, अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती.
राजगोळी खुर्द ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सरपंच सौ सुनंदा लक्ष्मण कडोलकर यांच्या हस्ते झाले. स्वागत ग्राम पंचायत अधिकारी संतोष दिवसे यांनी केले. यावेळी उपसरपंच जयश्री कांबळे व सदस्य उपस्थित होते.
दिंडलकोप ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सरपंच सौ संजीवनी नवला मनवाडकर यांच्या हस्ते झाले. ध्वज पूजन उपसरपंच महम्मदजुबेर काजी यांनी केले.
ग्रामपंचायत कागणी येथे उपसरपंच सुहास बामणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेवक बाळासाहेब खवरे यांनी केले. यावेळी सर्व सदस्य निवृत्त मुख्याध्यापक गुंडोपंत देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोवाड येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात संस्था सचिव एम. व्ही. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. आर. टी. पाटील यांनी केले. यावेळी प्र. प्राचार्य व्ही. आर. पाटील, आप्पा वांद्रे, याकूब मुल्ला आदी संचालक प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
श्रीराम विद्यालय व श्रीमान व्ही. पी. देसाई ज्युनिअर कॉलेज कोवाड येथे किणी कर्यात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव देसाई यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्राचार्य एस. टी. कदम सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्वरांजली हस्तलिखितचे प्रकाशन झाले.
केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री येथे मुख्याध्यापक पुंडलिक गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक कोमल शेठजी यांनी केले. श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री येथे खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री या संस्थेचे अध्यक्ष जी. एस. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापक ई. एल. पाटील यांनी केले. यावेळी हायस्कूलच्या वतीने आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment